जासकॅपचे उद्दिष्ट

जासकॅपच्या उद्दिष्टाचे दोन भाग आहेत. एक म्हणजे कर्करोग पीडित व त्यांची काळजी घेणारे यांना सहानुभूतिपूर्वक मदत करणे आणि दुसरा म्हणजे कर्करोगाबाबतची माहिती, जाण आणि प्रतिबंध या संबंधीचे कार्यक्रम हाती घेणे. जासकॅपचे प्रयत्न कर्करुग्ण, कर्करोगातुन बचावलेले आणि त्यांची काळजी घेणारे यांना भेडसावणार्‍या आर्थिक, शैक्षणिक, भावनिक आणि सामाजिक समस्यांबाबत आधार देऊन कर्करोगाचे निदान व उपचारानंतरच्या प्रश्नांमुळे निर्माण होणारे तणाव कमी करणे या प्रकारचे आहेत.

कर्करोगासंबंधी सध्या उपलब्ध मराठी पुस्तिका, तथ्य पत्रे व इतर माहिती संकेतस्थळाच्या या विभागात ठेवली आहे. सदर माहिती अद्ययावत करणे आणि अन्य कर्करोगासंबंधी माहिती मराठीत देण्याचे कार्य सतत चालू आहे. तरी कुठली विशिष्ठ माहिती आता इथे न सापडल्यास या संकेत स्थळाचा हिंदी किंवा इंग्रजी विभाग त्यासाठी बघावा. आपल्याला पाहिजे ती माहिती पुरवण्याचा आमचा प्रयत्न सदा राहील.