आमचे स्वयंसेवक

कुठलीही संस्था पैशाअभावी कार्य करू शकत नाही. जासकॅप तिला सढळ हाताने मदत करणाऱ्या दात्यांवर अवलंबून आहे. त्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे आमच्या स्वयंसेवकांचे विचार जासकॅपच्या विश्वस्तांसारखेच आहेत आणि ते कर्करोग पीडितांना मदत करू इच्छितात, हीच आमची मुख्य ताकद आहे. आम्हाला कल्पना आहे की वरील ध्येय असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे पर्याप्त प्रमाणात धन, जागा किंवा आवश्यक ते प्रशिक्षण असणे शक्य नाही. जासकॅप त्यांना यासाठी एक मंच उपलब्ध करून देते, ज्या द्वारे ते भरारी घेऊन कर्करुग्ण, कर्करोगातून बचावलेले आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांचा रोगामुळे निर्माण झालेला तणाव आणि अनिश्र्चितता दूर करण्यास मदत करू शकतात.
 
आम्हाला सुदैवाने अतिशय कार्यक्षम व सक्षम स्वयंसेवक लाभलेले आहेत. आम्ही आमच्या स्वयंसेवकांची काळजी घेऊन त्यांच्या गुणांचा वापर कर्करुग्णांच्या मदतीसाठी इष्टतम पद्धतीने करून घेतो. आमचे स्वयंसेवक कार्यक्रमांचे आयोजन, समुपदेशन, समाज प्रबोधन आणि आमच्या पुस्तकांचे भाषांतर अशा अनेकविध कार्यांना हातभार लावतात. आम्ही प्रत्येक स्वयंसेवकाबरोबर चर्चा करून त्याच्या गुणांचा, उर्जेचा आणि कौशल्यांचा उपयोग समाजात मागे पडलेले गरीब, गरजू आणि उपेक्षित अशा व्यक्तिंना मदत करण्यासाठी, तसेच कर्करोगाचे निदान आणि उपचार यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी ग्रस्त लोकांचा भार दूर करण्यासाठी करून घेतो.
 
आमचे स्वयंसेवक कर्करुग्ण आणि त्यांची काळजी घेणारे यांना विविध कर्करोग, त्यांचे निदान आणि उपचार व्यवस्थापन यासंबंधी माहिती देतात. मुंबईतील टाट-स्मृति रुग्णालयात स्थित आमच्या जासकॅपच्या पुस्तक-विक्री केंद्रातील कर्मचार्यांना ते मदत करतात. त्याचप्रमाणे टाटा स्मृति रुग्णालयाजवळील जासकॅप कर्करोग माहिती केंद्र चालवण्यास ते हातभार लावतात. त्यांच्या अशा सततच्या मदत व पाठींब्यामुळे आम्ही रुग्णांच्या गरजा, त्यांचे प्रश्र्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न व त्यांना आर्थिक मदत देऊन सर्वांना वैद्यकीय उपचार सुयोग्य प्रकारे मिळवता यावे अशी कार्ये करू शकतो. तसेच कर्करुग्णांना समुपदेशन आणि योग्य ती माहिती देण्यात आमच्या स्वयंसेवकांची भरीव मदत प्रमाणात होते. कर्करुग्ण आणि त्यांची काळजी घेणार्या व्यक्तिंना कर्करोगाचा सामना करताना प्रचंड अडचणी भेडसावतात आणि त्यात त्यांना भरघोसपणे आमचे स्वयंसेवक मदत करतात याचा आम्हाला अभिमान वाटतो. जासकॅप प्रत्येक स्वयंसेवकाच्या मानवी सेवेच्या योगदानाबद्दल त्याला अभिवादन करते.
 
तुम्हाला जासकॅपसाठी स्वयंसेवक व्हायचे असल्यास आमच्याशी फोन किंवा इ-मेल द्वारे तुमच्या कार्यरुचीबद्दल कळवा.
 
आमच्या स्वयंसेवकांची यादी अग्रक्रमाचा कुठलाही निष्कर्ष न लावता पुढीलप्रमाणे आहेः
 
सौ. अलीशा देसाई
श्री. आर. कृष्णमूर्ती
डॉ. विवेक पाटकर
श्रीमती नर्गिस ओलिया
श्री. उमेश महाजन
श्री. उल्हास सावंत 
सौ.  विमल मोहिते