पुस्तक-विक्रीकेंद्र

जासकॅपचे टाटा-स्मृति रुग्णालयातील पुस्तक-विक्रीकेंद्र

मुंबईतील मध्यवर्ती भागात स्थित टाटा-स्मृति रुग्णालयात जासकॅपने सन 2001 मध्ये कर्करुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या माहितीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू केलेले पुस्तक-विक्रीकेंद्र कार्यरत आहे. या पुस्तक विक्री केंद्रामार्फत आम्ही हिंदी, मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, तामिळ, मल्याळम , आसामी , ओडिआ आणि इंग्रजी भाषांत कर्करोगाशी संबंधित पुस्तके व माहितीपत्रके अतिशय स्वस्त दरात उपलब्ध करून देतो. सध्या जासकॅप पुस्तक-विक्रीकेंद्रात इंग्रजीमध्ये १११, हिंदीमध्ये ६८, मराठीमध्ये ५७, बंगालीमध्ये ३६, गुजरातीमध्ये २८, कन्नडमध्ये ३७, तामिळमध्ये १० व मल्याळममध्ये ७ तेलुगूमध्ये ३५ , आसामीमध्ये  ३ आणि ओडिआमध्ये  ६ या संख्येत विविध कर्करोगाबाबत पुस्तके उपलब्ध आहेत. त्याशिवाय जासकॅपच्या पुस्तक-विक्रीकेंद्रात वरील सर्व भाषांत आकडेवारी आणि कर्करोगाबाबत इतर माहिती देणारी विविध पत्रके उपलब्ध आहेत.

जासकॅपचे पुस्तक विक्रीकेंद्र टाटा-स्मृति रुग्णालयाच्या विस्तारित वास्तूच्या प्रवेशद्वाराशी आहे. रुग्णालयाचे सुट्टीचे दिवस सोडून हे पुस्तक विक्री केंद्र सोमवार ते शुक्रवार रोज सकाळी ९.30  ते संध्याकाळी ५.30  वाजेपर्यंत उघडे असते.

 

पुस्तक-विक्रीकेंद्रात उपलब्ध असलेली सर्व पुस्तके, पुस्तिका आणि माहिती पत्रिकांची मागणी ऑनलाईन माध्यमातून इलेक्ट्रॉनिक प्रपत्र, जे आमच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे, ते भरून करता येईल.