आमची कार्य पध्दती

जासकॅप कर्करुग्ण, आणि त्यांचे कुटुंबिय, त्यांची काळजी घेणारे या सर्वांना कर्करोगाचे निदान आणि उपचारांचे आयोजन यासंबंधी प्रमाणित साहित्य, तसेच सल्ला देणे अशी कार्ये या विषयीचे ज्ञान आणि माहिती एकत्र करुन प्रबोधनाचा पुढाकार घेणे याप्रकारे करते. पुस्तिका व दृक-श्राव्य साहित्य हिंदी, मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, तामिळ, मल्याळम, आणि इंग्रजी अशा भाषांत पुरवून कर्करोगाबद्दलची माहिती लोकांना देणे ते कर्करुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक, भावनिक आणि सामाजिक आधार देणे, अशी विविध कार्ये जासकॅप प्रामुख्याने हाती घेते. आम्ही आशा करतो की आमच्या अशा कार्यामुळे कर्करुग्ण आणि त्यांची काळजी घेणारे यांना या भयावह रोगाचा धैर्याने सामना करण्याचे बळ प्राप्त होत असेल.

जासकॅपची कार्ये खालीलप्रमाणे चार विभागात मांडता येतीलः

  1. लोकांना कर्करोग आणि त्याचे व्यवस्थापन याबद्दल माहिती देऊन जागृती निर्माण करणे. या संदभार्त हिंदी, मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, तामिळ, मल्याळम आणि इंग्रजी या भाषांतून पुस्तिका आणि माहितीपत्रके छापून अगदी माफक किंमतीत उपलब्ध करुन देणे असे कार्य आमच्या टाटा-स्मृति रुग्णालय, मुंबई येथील पुस्तक-विक्री केंद्राद्वारे केले जाते, तसेच अंकीय स्वरुपात देखील ही माहिती दिली जाते, जसे की दृक-श्राव्य सी. डी. आणि डी. व्ही. डी.
  2. कर्करुग्ण आणि कर्करोगातून बरे झालेल्या लोकांसाठी निदान, उपचार आणि पुनर्वसन यासाठी आर्थिक मदत करणे, विशेषतः बाल-कर्करुग्णांसाठी.
  3. लोकांमध्ये कर्करोगाबद्दल जागृती निर्माण करणे.
  4. कर्करोग कसा टाळावा व त्याचे लवकर निदान आणि त्वरीत उपचार कसे करावे यांचे महत्व सांगणारे कार्यक्रम प्रायोजित करणे.