आमचा कर्मचारीवृंद

काम करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे प्रयोजन वेगळे असते. त्यामुळे काम करण्यासाठी जितक्या व्यक्ती तेवढी भिन्न कारणे सहज असू शकतात. कार्यापासून आपल्याला काही तरी प्राप्ति होईल या उद्देशाने आपण सगळे कार्य करत असतो. आमच्या जासकॅपमधील सर्व कर्मचारीवृंद एकजुटीने, संघिक भावनेने आणि एकूणच प्रत्येकाच्या आयुष्याचा दर्जा वाढावा या तळमळीने काम करतो, असा आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या कर्मचारीवृंदास कर्करोगाच्या विविध पैलूंवर काम करण्यास प्रोत्साहन देतो, कारण त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि त्यांचे सहकार्य जासकॅपसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्करुग्ण, त्यांचे कुटुंबिय आणि त्यांची काळजी घेणारे यांना सहाय्य करणे या जासकॅपच्या ध्येयपूर्तीसाठी आमच्या कर्मचारीवृंदाची सर्जनशीलता व नव्या कल्पना फार मोठी भूमिका बजावतात.

जासकॅप मधील आमचे कर्मचारी अन्य सदस्यांशी मिळून मिसळून एका कुटुंबासारखे वातावरण निर्माण करतात. प्रत्येक कर्मचार्‍याचे गुण आणि विशेषता या संस्थेचा विकास साधण्यात त्या प्रत्येकाचे योगदान आम्हाला मोलाचे वाटते. ते आमच्या स्वयंसेवकांसोबत मन लावून काम करत असल्यामुळे आमच्या कक्षेत येणार्‍या मोठ्या कर्करुग्ण समुदायास मदत करण्याच्या कार्यास अनेकपटीने सहाय्य मिळत आहे. आमचे कर्मचारी ही आमची मोठी शक्ती आहे. त्यांच्या उच्च मुल्यांमुळे आणि कृतीमुळेच आमची संस्था मोठ्या व भरीव प्रमाणात कार्य करू शकते.

आमचे कर्मचारी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक पार पाडतात. ते कुठल्याही प्रश्नाबाबत चर्चा व इतरांशी सल्लामसलत करूनच पाऊल उचलतात. आपल्या कामाचा प्रत्येक क्षण कर्करुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी उपयोगी पडावा या भावनेने आमचे कर्मचारी हाती घेतलेले प्रत्येक कार्य उच्च कोटीच्या क्षमतेने करण्याचा प्रयत्न करतात. जासकॅप आपल्या प्रत्येक कर्मचार्याचे कठोर परिश्रम व कर्करुग्णांना मदत करण्यासाठी स्वतःला झोकून देणे या प्रवृत्तीचे स्वागत करून आभार मानते.

आमच्या कर्मचारीवृंदात पुढील व्यक्तिंचा समावेश आहेः

श्री. के.व्ही. गणपती, एम. एस्सी. एम.बी.ए.

सौ. उमा जोशी, बी.एस्सी.

सौ. सरोज राव

सौ. अरुणा ठाकूर

श्री. निलाद्री गुहा

श्री. रमाशंकर यादव

सौ. सायली नवल्यू