जासकॅप सूचना केंद्र

कर्करोग माहिती केंद्र – टाटा-स्मृती रुग्णालयाजवळचे जासकॅपचे कर्करोग माहिती केंद्र

कर्करोगाचे विविध पैलू कर्करुग्णांना माहिती करून देण्यासाठी जासकॅपने 6 मे 2011 रोजी टाटा-स्मृती रुग्णालयाजवळ एक कर्करोग महिती केंद्र सुरू केले आहे.

मुंबईत मध्यवर्ती स्थित या कर्करोग माहिती केंद्रात टाटा-स्मृती रुग्णालयातील तसेच इतर कुठल्याही भागातील कर्करुग्णांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. कर्करोगाच्या अनेक घटकांची माहिती लोकांना करून द्यावी या उद्देशाने हे कर्करोग माहिती केंद्र स्थापन केले असून आमचे प्रशिक्षित कर्मचारी आणि स्वयंसेवक इथे मार्गदर्शन व समुपदेशन करतात. सदर कर्करोग माहिती केंद्रात आम्ही रुग्ण, त्यांचे कुटुंबिय आणि काळजी घेणारे यांस निःशुल्क सेवा पुरवतो.

  • आम्ही विविध कर्करोग आणि त्यांचे व्यवस्थापन याबाबत माहिती पुरवतो.
  • कर्करोग का होऊ शकतो आणि टाळता येण्यासारखे कर्करोग कुठले व ते कसे टाळावेत याबाबत लोकांना सांगतो.
  • गटांमध्ये आम्ही लोकांना कर्करोग टाळणे व त्यांच्या उपचारांबाबत आमच्याकडील दृक-श्राव्य सी.डी. आणि डी.व्ही.डी. माध्यमातून माहिती देतो.
  • कर्करुग्ण, कर्करोगातून बचावलेले आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करून आयुष्याचा दर्जा कसा वाढवता येईल याचे प्रबोधन करतो.
  • कर्करुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी व्यक्तिगत पातळीवर सल्ला व समुपदेशन देतो.