जासकॅपचा इतिहास

सौ. नीरा. प्र. राव. आणि श्री प्रभाकर कृ. राव. यांचा मुलगा सत्यजीत (जीत) हा कर्करोगाचा बळी ठरला. जीत याला टी-पेशी लिम्फोमा कर्करोगाने डिसेंबर 1995 ते मे 1996 दरम्यान तो अमेरिकेतील कोलोराडो राज्यातील डेन्वर या शहरात असताना पछाडले. 23 मे 1996 रोजी त्या शहरात सदर कर्करोगाने त्याची जीवनज्योत मालवली.

सौ. व श्री. राव यांनी सत्यजीत गेल्याचे दुःख विधायक कामातून विसरायचे ठरवले आणि भारतातील कर्करुग्ण आणि त्यांची काळजी घेणारे तसेच कुटुंबियांना आधार देण्याचे कार्यक्रम हाती घेण्याचे निश्चित केले.

त्यानुसार जासकॅप म्हणजे जीत असोसिएशन फॉर सपोर्ट टू कॅन्सर पेशंट्‌स ही संस्था 16 ऑक्टोबर 1996 रोजी त्यांनी नोंदणीकृत करुन घेतली, आणि 18 डिसेंबर 1996 रोजी तिला धर्मादाय आयुक्ताकडून सार्वजनिक धर्मादाय न्यास अशी मान्यता मिळाली व तिला देण्यात येणार्‍या दान रकमेला आयकरातून कायदा 1961 च्या कलम 80 जी (1) अन्वये सूट मिळाली.